पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी आज बारामती तालुका प्रतिनिधी अ वर्ग मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, अजितदादांच्या राजकारणाची सुरुवातच जिल्हा सहकारी बॅंकेवरील निवडीपासून झाली आहे, त्यामुळे त्यांचे बॅंकेशी विशेष नाते आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, दत्तात्रेय येळे, सतीश खोमणे यांनीही अर्ज भरले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुण्यातील निवडणूक कार्यालयात अजित पवार यांच्या वतीने आज दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या बारामती तालुका प्रतिनिधी ‘अ’ वर्ग मतदारसंघात एकूण 195 मतदारांचा समावेश आहे. त्यातील बहुतांशी मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत, त्यामुळे आता पवारांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 1991 पासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी सात वेळा पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार..
अजित पवार यांच्या राजकारणाचा प्रारंभ हा पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदापासूनच झालेला आहे. त्यामुळे या बँकेशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या काही वर्षांपासून अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व असून संचालक मंडळही त्यांच्याच संमतीने ठरणार हे उघड आहे.
दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या दुसऱ्या जागेवर अजित पवार हे विद्यमान संचालक मदनराव देवकाते यांना संधी देतात की नव्या चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते, याकडे बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या अजित पवारांशी जुळवून घेतलेले कट्टर विरोधक सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
Read Also :
- परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ
- ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
- उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली
- साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
- सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा