मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर ते जवळपास ९ दिवस महाराष्ट्र बाहेर होते. सुरूवातीला ते सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी आणि मग गोव्यातून ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर एकनाथ शिंदे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले. अन् त्यानंतर त्यांनी राजभवन येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून यावरून राज्यातील विविध नेत्यांनी त्यावर टिका केलीय.
महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
महाविकास आघाडीतील प्रत्येक राजकीय नेत्यांनी या परिस्थितीबाबत भाष्य करीत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यातच आता काॅंग्रसेचे प्रवक्ते अतुल लोंढें यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टिका केली आहे. संघी लोकांची अवस्था खराब. दिवसरात्र मेहनत करून स्वतःच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री करतात, मग हा कसा मास्टरस्ट्रोक आहे यावर भांडत बसतात. इतर पक्षातून आलेल्या गुन्हेगारांसाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावतात, मग कोणी टिका केली की ‘जय भारत! जय भारत’ करत राहतात. असंह म्हटलं आहे.
“आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेद घेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्याने अनेकांना याचा धक्का बसला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राहणार नसून बाहेरून त्यांना पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य देखील फडणवीसांनी बोलून दाखवलं. त्यानंतर शपथविधी समारोहाच्या वेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन केल्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावरून देखील त्यांच्यावर टिका करण्यात आली.
संघी लोकांची अवस्था खराब. दिवसरात्र मेहनत करून स्वतःच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री करतात, मग हा कसा मास्टरस्ट्रोक आहे यावर भांडत बसतात. इतर पक्षातून आलेल्या गुन्हेगारांसाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावतात, मग कोणी टिका केली की ‘जय भारत! जय भारत’ करत राहतात.
— Atul Londhe (@atullondhe) August 8, 2022
Read also
- “अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
- मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”