पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. राज्यात १०५ आमदार निवडून आणूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारलं. त्यांना उपमुख्यमंत्री केलं. आता आणखी एक उपमुख्यमंत्री आणून बसवला. ते माझे भाऊ आहेत. माझ्या भावाचा अपमान नका करू. देवेंद्र फडणवीस सर्वच मेरीटवर पास झाले. त्यांना १० पैकी १० मिळायला हवे. पण भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री करून पाच गुणांवर आणले. आणखी एक उपमुख्यमंत्री आणून अडीच गुणांवर आणले. त्यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपाच्या काळात नागपूरमध्ये गुंडगिरी वाढली. असा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
हेही वाचा…ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवली तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
मागील काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवून केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावरून राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी यावर भाष्य केलं असून भाजपकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु आज ठाकरे गटाने सामानातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“राजकीय द्वेषातून एक रुपयाही दिला जात नाही”, रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची कॅपसिटी आहे व ती कॅपिसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कॅपसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कॅपसिटी असतांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कॅपसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गटाने म्हटल्याचं सांगत सामनातून फडणवीस आणि शिंदेवर घणाघात केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ४१ आमदारांचं काय होणार ? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी
हेही वाचा…‘या’ पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार, आज घोषणा, इंडिया आघाडीची सत्व परिक्षा तर भाजपलाही धाकधूक
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवणार? फडणवीसांची कॅपसिटी दिल्लीतच
हेही वाचा…“मोदींना निमंत्रित केले, आता राहुल गांधींना बारामतीत आणले तरीही उपयोग होणार नाही”
हेही वाचा…राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पॉवर’ खात्याचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये निराशा..!