पुणे : आरोग्य व्यवस्थेला निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. परंतु शिंदे साहेबांच वक्तव्य केवळ लोकांना सांगण्यापुरतंच असून प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत आणि जामखेड येथील उपजिल्हा रूग्णालयाचं अर्ध कामं झालं परंतू उर्वरित कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार रोहित पवारांनी केली आहे.
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?
रोहित पवार यांनी बाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, आरोग्य व्यवस्थेला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य केवळ लोकांना सांगण्यापुरतं राहू नये तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही झाली पाहिजे.. माझ्या मतदारसंघात कर्जत आणि जामखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयांचं काम जवळपास निम्मं झालं तरी राजकीय द्वेषातून त्यासाठी एक रुपयाही दिला जात नाही. त्यामुळं पुढील काम रखडलं आहे.
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली
दरम्यान, राजकीय द्वेष कमी करून सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे. तसंच राज्यात सर्वत्र निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्यावरही तातडीने मार्ग काढला पाहिजे, तरच आरोग्य व्यवस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, या मुख्यमंत्री महोदयांच्या वक्तव्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. असंही रोहित पवारांनी म्हटलंय.
आरोग्य व्यवस्थेला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य केवळ लोकांना सांगण्यापुरतं राहू नये तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही झाली पाहिजे.. माझ्या मतदारसंघात कर्जत आणि जामखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयांचं काम जवळपास निम्मं झालं तरी राजकीय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पालकमंत्री पद काढलं तरी चंद्रकांत पाटलांचा पुण्यासाठी जिव्हाळा कायम,” कार्यकर्त्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद द्या,” राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवार गट सक्रीय
हेही वाचा…किंग ऑफ पुणे’… लोकसभा निवडणूक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडवला बार
हेही वाचा…पक्ष फुटीचा राज्यात ‘कुणाला’ फायदा ? लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेत मोठी माहिती समोर
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार