नाशिक : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठा पेच निर्माण होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी २५ वर्षापासून असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांचं मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न आतापर्यंत अधूर राहिलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून याबाबत वारंवारं खंत व्यक्त करून दाखविली आहे. यातच आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांनी अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी ताकद द्यावी लागणार असं बोलून दाखवलं.
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळवण येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, खासदार, आमदार आणि मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, ते निवडून येतील यासाठी तयारी करावी लागेल, परंतु अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद द्यावी लागेल, असं भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवले.
कळवण दौऱ्यावर असतांना अजित पवारांनी वणीच्या गडावर जाऊन सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेतलं. यानंतर अजित दादांना राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होऊ दे असे साकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घातले असल्याचं म्हटलं. यातच अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांचे पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत.
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न
दरम्यान, एका बाजूला एकनाथ शिंदे यांनाच पुढचा मुख्यमंत्री म्हणून भाजप समोर आणत असतांना अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पवार गट सक्रिय झाला आहे. यातच मागील काही दिवसापासून भाजपच्या नेत्यांच्या तोंडी देखील अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचं दिसून आलं आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडाळी करून महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु महायुतीमध्ये अजिदादाचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पुर्ण होणार का ? ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…किंग ऑफ पुणे’… लोकसभा निवडणूक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडवला बार
हेही वाचा…पक्ष फुटीचा राज्यात ‘कुणाला’ फायदा ? लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेत मोठी माहिती समोर
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली