पुणे : भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांची नियुक्ती केली. यानंतर पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच पुण्याच्या पालकमंत्री गेले असले तरी पुण्यातील विकासकामांचा आढावा घेणे चंद्रकांत पाटलांकडून सुरूच आहे.
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली
एकनाथ शिंदेंनी पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करत चंद्रकांत पाटलांकडे सोलापुर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं. चंद्रकांत पाटलांकडून पुण्याचे पालकमंत्री पद काढून घेतल्याने भाजपचे नेते नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. यातच पालकमंत्री पद गेले असले तरी भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही, या शब्दात पाटील यांनी आपल्या समर्थकांची समजूत गुरूवारी काढली.
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?
दरम्यान, गुरूवारी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी शेवटची बैठक घेतली. या बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण पुण्याचे पालकमंत्री नसलो, तरी कायद्यान्वये सहपालकमंत्री आहोत, त्यानुसार दर दोन महिन्यांनी शहरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेणार आहे. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शहरातील भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
READ ALSO :
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद द्या,” राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवार गट सक्रीय
हेही वाचा…किंग ऑफ पुणे’… लोकसभा निवडणूक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडवला बार
हेही वाचा…पक्ष फुटीचा राज्यात ‘कुणाला’ फायदा ? लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेत मोठी माहिती समोर
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?