नवी दिल्ली : आगामी काही महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर करणार आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकांमध्ये बघितलं जात आहे.
हेही वाचा…“पालकमंत्री पद काढलं तरी चंद्रकांत पाटलांचा पुण्यासाठी जिव्हाळा कायम,” कार्यकर्त्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबतच होणार का ? याची चर्चा सुरू होती. पण तुर्तास त्याला पूर्णविराम मिळाला असून आज निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. सध्या मध्यप्रदेश भाजपच्या ताब्यात असून छत्तीसगड आणि राजस्थान काॅंग्रेसकडे आहे. तर मिझोरम राज्य मिझो नॅशनल फ्रंटकडे, आणि तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडे असून येत्या निवडणुकीमध्ये सत्ता टिकवण्यासाठी या सर्वांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद द्या,” राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवार गट सक्रीय
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. देशातील विरोधी पक्षांची एकजूट या निवडणुकांमधून दिसून येईल अन् आगामी लोकसभा निवडणुकीवर याचा मोठा परिणाम दिसून येईल. त्यामुळे भाजपसोबत इंडिया आघाडीची देखील सत्व परिक्षा या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमधून दिसून येण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवणार? फडणवीसांची कॅपसिटी दिल्लीतच
हेही वाचा…“मोदींना निमंत्रित केले, आता राहुल गांधींना बारामतीत आणले तरीही उपयोग होणार नाही”
हेही वाचा…राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पॉवर’ खात्याचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये निराशा..!
हेही वाचा…ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवली तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“राजकीय द्वेषातून एक रुपयाही दिला जात नाही”, रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप