मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. यातच ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाच्या संलग्न विविध समित्यांची आज तातडीची बैठक शिवसेना भवनावर होत आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरेंनी मोठी रणनिती आखली आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ४ जागा लढविण्यासाठी आग्रही आहेत. यातच आता लोकाधिकार समिती महासंघाच्या संलग्न विविध समित्यांची आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. काही वेळात या बैठकीला सचिव खासदार अनिल देसाई, कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, आमदार सुनिल शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरण सध्या निवडणुक आयोगात गेलं आहे. तर शिवसेना १६ अपात्र आमदारांवरील निकाल अद्यापही लागलेला नाहीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाबाबत काय निर्णय घेणार ? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकीय द्वेषातून एक रुपयाही दिला जात नाही”, रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
हेही वाचा…“पालकमंत्री पद काढलं तरी चंद्रकांत पाटलांचा पुण्यासाठी जिव्हाळा कायम,” कार्यकर्त्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद द्या,” राज्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवार गट सक्रीय
हेही वाचा…किंग ऑफ पुणे’… लोकसभा निवडणूक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी उडवला बार
हेही वाचा…पक्ष फुटीचा राज्यात ‘कुणाला’ फायदा ? लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेत मोठी माहिती समोर