ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आई भवानीकडे आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर असा आशीर्वाद मागितला असल्याचं फडणवीसांनी सांगितले.
“अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं”; रामदास आठवले
ते म्हणाले की, आई भवानीकडे इतकेच मागणे मागितले की आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर. तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघांना शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून लोकहिताची कामे करण्याची शक्ती दे आई. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याठिकाणी देवीचे दर्शन घेतले होते.
“अंधेरी पुर्व पोटनिवडणुक..! उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार”; ? निर्णय अजून
अलिकडेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं होतं. तर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली होती. यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील केली होती.
Read also
- “आमचच नाणं खणखणीत, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलतोय”; सुप्रिया सुळे
- “पवार साहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला निघालोय”; शहाजी बापू पाटील
- सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
- “दसरा मेळाव्यात अन् अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिंदेंची लोकप्रियता दिसणार”
- सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”