पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एव्हाना देशात महागाई, बेरोजगारी इत्यादी मुद्दांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसात पीआयएफवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर आरएसएसवर देखील बंदी घालावी अशी मागणी होत होती. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप-सेनेच्या लढाईत, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा..! अंधरी पुर्व पोटनिवडणुकीत रंगत येणार
महागाई तसेच बेरोजगारी यावर अलिकडेच राष्ट्रीय स्वंय संघातील नेत्यांनी भाष्य केलेलं मी वर्तमान पत्रात वाचलं होतं. त्यांचं मनापासून मी स्वागत करते. कारण काही गोष्टी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. संसदेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून महागाई अन् बेरोजगारीबाबत सातत्याने बोलत आली आहे. तसेच कोणतंही राजकारण न आणता राष्ट्रीय स्वंय़ संघाने महागाई आणि बेरोजगारीबाबत जे काही भाष्य केलं आहे. त्याचं मी मनापासून स्वागत करते. अस सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन म्हणजे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न”
राज्यात अनेक दिवसापासून निवडणुका लागल्या नाहीत. त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या लवकरच लवकर घ्याव्यात. जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील. तसेच शिवसेनेच्या निवडणुक चिन्हांबाबत त्या म्हणाल्या की, ज्यावेळी राष्ट्रवादीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर चिन्ह गेल्यानंतरही राष्ट्रवादीचे नेते निवडणून आले होते. तसेच हेही प्रकरण तसेच आहे. त्यामुळे निवडणुक चिन्ह गेलं तरी ते चिन्ह घरोघरी पोहचवण्यासाठी संघटना आपली आहे. त्यामुळे त्याची काही काळजी घेऊ नये. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं”; रामदास आठवले
- “अंधेरी पुर्व पोटनिवडणुक..! उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार”; ? निर्णय अजून
- “पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण?” राष्ट्रवादीचा पलटवार
- “बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस हा बहुजनांचा कर्दनकाळ”; गोपीचंद पडळकर
- “लक्षात ठेवा…! आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत”; फडणवीसांचा इशारा