पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील आणि राष्ट्रवादीमध्ये अलिकडे चांगलीच खडाजंगी बघायला मिळत आहे. शहाजी बापू पाटलांची शरद पवारांवर बोलण्याची पात्रता नाही. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी शहाजी बापू पाटलांना सुनावलं होतं. त्यावर आता शहाजी बापू पाटलांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण?” राष्ट्रवादीचा पलटवार
शरद पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रातील साडे 13 कोटी जनतेला आहे. शरद पवारांएवढी माझी पात्रता नाही ही वास्तवता जरी असली, तरी पवारसाहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला मी निघालोय. गावच्या ग्रामपंचायत सदस्याला देखील शरद पवार, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलं आहे.
“बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस हा बहुजनांचा कर्दनकाळ”; गोपीचंद पडळकर
पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. तसेच शरद पवार हे एकट्या अजित पवारांच्या मालकीचे नाहीत. ते राज्याचे, देशाचे नेते आहेत. त्यांचं नेतृृत्व, व्यक्तिमत्व हे केवळ अजित पवार यांच्या पुरते मर्यादित नाही. त्यांच्या विषयी चांगलं बोलण्याचा आणि टीका कऱण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. असा टोला देखील त्यांनी हाणला आहे.
“लक्षात ठेवा…! आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत”; फडणवीसांचा इशारा
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा रंगली आहे. उद्या पाच ऑक्टोंबरला मुंबईत दसरा मेळाव्यानिमित्ताने सभांचा पाऊस पडणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या सभेला तुफान गर्दी होणार आहे. बीेकेसी मैदान हा आता एकनाथ शिंदे यांचा कायमचा मैदान ठरणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सभेला य़ावं. असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
Read also
- सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
- “दसरा मेळाव्यात अन् अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिंदेंची लोकप्रियता दिसणार”
- सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”
- “अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं”; रामदास आठवले
- “अंधेरी पुर्व पोटनिवडणुक..! उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार”; ? निर्णय अजून