मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत मागील काही महिन्यात ह्दयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे अंधेरी पुर्व मतदारसंघात विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आगामी सहा महिन्यात या मतदारसंघात पोटनिवणुक घेणे बंधणकारक असल्याने या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आता निवडणुक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेनेत लढत असून राष्ट्रवादीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर आता भाजपने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“लक्षात ठेवा…! आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत”; फडणवीसांचा इशारा
एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता किती वाढली? हे दसरा मेळाव्यात समजेल. तसेच आणि अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता दिसणार आहे. ही राजकीय निवडणुक आहे. त्यामुळे त्याठिकाणी सगळंच दिसेल. असं कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजप-सेनेच्या लढाईत, राष्ट्रवादीचा सेनेला पाठिंबा..! अंधरी पुर्व पोटनिवडणुकीत रंगत येणार
अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकसाठी उमेदवारांना 14 ऑक्टोबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.
Read also
- सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”
- “अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं”; रामदास आठवले
- “अंधेरी पुर्व पोटनिवडणुक..! उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार”; ? निर्णय अजून
- “पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण?” राष्ट्रवादीचा पलटवार
- “बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस हा बहुजनांचा कर्दनकाळ”; गोपीचंद पडळकर