पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील आणि राष्ट्रवादीमध्ये अलिकडे चांगलीच खडाजंगी बघायला मिळत आहे. शहाजी बापू पाटलांची शरद पवारांवर बोलण्याची पात्रता नाही. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी शहाजी बापू पाटलांना सुनावलं होतं. त्यावर आता शहाजी बापू पाटलांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“अंधेरी पुर्व पोटनिवडणुक..! उद्धव ठाकरे कोणत्या निवडणुक चिन्हांवर लढणार”; ? निर्णय अजून
शरद पवारांबद्दल बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रातील साडे 13 कोटी जनतेला आहे. शरद पवारांएवढी माझी पात्रता नाही ही वास्तवता जरी असली, तरी पवारसाहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला मी निघालोय. गावच्या ग्रामपंचायत सदस्याला देखील शरद पवार, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलं आहे.
“पडळकर तुम्ही ताटात जेवता की गोठ्यात? अन्न खाता की शेण?” राष्ट्रवादीचा पलटवार
पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. तसेच शरद पवार हे एकट्या अजित पवारांच्या मालकीचे नाहीत. ते राज्याचे, देशाचे नेते आहेत. त्यांचं नेतृृत्व, व्यक्तिमत्व हे केवळ अजित पवार यांच्या पुरते मर्यादित नाही. त्यांच्या विषयी चांगलं बोलण्याचा आणि टीका कऱण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. असा टोला देखील त्यांनी हाणला आहे.
“बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस हा बहुजनांचा कर्दनकाळ”; गोपीचंद पडळकर
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शहाजी बापू पाटील यांचे ते मत आहे. त्यांना तसे वाटत असेल तर काहीही हरकत नाही. विरोधकही दिलदार असायला हवा. ते आमच्यावर रोजच टिका करत असतात. ही चांगलीच बाब आहे. आपण आंब्याच्याच झाडाला दगड मारत असतो. बाभळीला कोणी दगड मारत असतो. आपलंच नाणं खणखणीत आहे, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलत आहे.
Read also
- “पवार साहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला निघालोय”; शहाजी बापू पाटील
- सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
- “दसरा मेळाव्यात अन् अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत शिंदेंची लोकप्रियता दिसणार”
- सुप्रिया सुळेंकडून RSS चं मनभरून कौतुक…! म्हणाल्या,”राजकारण बाजूला ठेऊन..;”
- “अजित पवारांना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं”; रामदास आठवले