मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतु तरीही राज्यात मराठा समाज राजकीय नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असतांना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
हेही वाचा…“सरकार काय भाड्याने चालवायला दिलं आहे का?” वंंचितचा राज्य सरकारवर हल्लाबोल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुणे विमानतळावरून येत असतांना युवक काॅंग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. त्यानंतर पोलिसांनी युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…लोकसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? आव्हाडांनी सांगितली दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारातली बातमी
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून मराठा आरक्षण देण्याची कमिटमेंट दिली आहे. याविषयीची कारवाई सरकार करत आहे. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये ही सरकारचीच नाही तर समाज आणि राजकीय नेत्यांची पण जबाबदारी असल्याचं फडणवीसांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाने दाखल केलेल्या शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू, निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार, दिवाळीचा दौराही केला जाहीर
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस
हेही वाचा…राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी एकनाथ शिंदे सरसावले, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…बागेश्वर धामच्या दरबारात नऊ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, कृष्णचा भजन गायल्याने मुलाचा जन्म, मॉं शेरावाली प्रसन्न