मुंबई : आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या संतप्त आणि अस्वस्थ वातावरणामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आलेली युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी येथून युवा संघर्ष यात्रा सुरू होणात असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी याचिकाकर्त्यांना ठाकरेंकडून ५० कोटींची ऑफर, नितेश राणेंचा गंभीर आरोप
राज्यातील तरूणांच्या प्रश्नांसाठी रोहित पवारांनी दसऱ्याच्या दिवशी युवा संघर्ष यात्रेला सुरूवात केली होती. या युवा संघर्ष यात्रेचा शेवट नागपूर येथे होणार आहे. परंतु मध्यंतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता. राजकीय नेत्यांना गावकऱ्यांनी गावबंदी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ही युवा यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा…“यंदा दिवाळीत कुणालाही भेटणार नाही ?” अजित पवारांनी ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय
दरम्यान, युवा संघर्ष यात्रेच्या अगोदर रोहित पवार यांनी छोटाखानी दौरा आखला आहे. १२ ऑक्टोंबरला रोहित पवार चौंडी, अंबड, आणि सिंदखेडराजा येथे दिपोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर १४ आक्टोंबर ते बीड येथील मराठा आंदोलकांनी जाळलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात पाडवा साजरा करणार आहेत. त्यानंतर १५ ऑक्टोंबरला पारनेर-मंगळगंगा देवी दर्शन आणि भाऊबीज तर १७ तारखेला चौंडी येथून युवा संघर्ष यात्रेची पुन्हा सुरूवात करणार आहेत.
आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या संतप्त आणि अस्वस्थ वातावरणामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आलेली युवांच्या प्रश्नांसाठीची राज्यातील सर्वांत मोठी #युवा_संघर्ष_यात्रा पुन्हा सुरु होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथून… pic.twitter.com/8qxmZ3O43W
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस
हेही वाचा…राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी एकनाथ शिंदे सरसावले, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…बागेश्वर धामच्या दरबारात नऊ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, कृष्णचा भजन गायल्याने मुलाचा जन्म, मॉं शेरावाली प्रसन्न
हेही वाचा…“सरकार काय भाड्याने चालवायला दिलं आहे का?” वंंचितचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…लोकसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? आव्हाडांनी सांगितली दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारातली बातमी