मुंबई : पक्ष फुट त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. यातच मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत होती. त्यावेळी अजित पवार आजारी पडले. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. यातच आता यंदाची दिवाळीत कुणालाही न भेटण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.
हेही वाचा…“नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटला, नाशिकच्या शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात याचिका”
अजित पवार यांना मागील काही दिवसांपासून डेंग्यू झाला आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत कुणालाही न भेटण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्लानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत असल्याचं त्यांनी ट्विटवरून सांगितलं आहे. तसेच आजारपणामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…नांदेडचे ‘हे’ पिता-पुत्र शिंदे गटात दाखल, शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश प्रवेश
दरम्यान, डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. असंही अजित पवारांनी म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बीआरएसचा बडा नेता शरद पवार गटात दाखल, तर माजी आमदाराला शरद पवार गटातच लागली मोठी लॉटरी”
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंचं एक ट्विट, अन् रस्ता घोटाळ्यातील कंत्राटदाराला पालिकेने दिला नारळ!
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांनी घोषित केला महाराष्ट्र दौरा, ” कसा असेल महाराष्ट्र दौरा ?