नांदेड : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पक्ष फुट प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला. यातच आता नांदेड येथील माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
नांदेड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक शंकरसिंह गाडीवाले आणि माजी नगरसेवक संदीपसिंह शंकरसिंह गाडीवाले यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हे दोन्ही नगरसेवक नांदेड महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक असून दोन वेळा ते नांदेड मनपामध्ये नगरसेवकपदी निवडून आले आहेत. या मतदारसंघात त्यांनी दोन्ही वेळेला काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा पराभवही केला होता.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?
दरम्यान, शंकरसिंह गाडीवाले आणि संदीपसिंह शंकरसिंह गाडीवाले यांचं एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह सहसंपर्कप्रमुख दर्शन सिंह सिद्धू, श्याम पाटील वानखेडे, पंडित पावळे, गुरुनाथ पैडारकर यांचा देखील पक्षप्रवेश संपन्न झाला. यासमयी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर तसेच शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, शिवसेना नांदेड संपर्कप्रमुख आनंद जाधव तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#नांदेड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक शंकरसिंह गाडीवाले आणि माजी नगरसेवक संदीपसिंह शंकरसिंह गाडीवाले यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हे दोन्ही नगरसेवक नांदेड महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक असून दोन वेळा ते नांदेड मनपामध्ये नगरसेवकपदी निवडून आले आहेत. या मतदारसंघात… pic.twitter.com/jpcYz8V77L
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका”, तानाजी सावंतांना मनोज जरांगे पाटलांनी खडसावलं
हेही वाचा…“ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय आमचाच समजून भाजपने फटाके फोडले तर…” राष्ट्रवादीने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती?, SIT चौकशी लावा,” पंकजा मुंडेंची मागणी
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय