मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. या बैठकीसाठी अनेक मोठे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले.
हेही वाचा…पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय
धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.
राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता
मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.
अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार
हेही वाचा…“आम्हालाच ओबीसींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू”, छगन भुजबळांचा गंभीर आरोप
मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.
गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार
विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा
मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल
बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार
महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार
नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ
READ ALSO :
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?
हेही वाचा…हसन मुश्रीफ महादेव अॅपचे सदस्य..! राऊतांच्या आरोपांवर मुश्रीफांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..,
हेही वाचा…“ना देवेंद्र फडणवीस ना अजित पवार,” कार्तिकी एकदशीला विठ्ठालाची शासकीय पुजा कोण करणार?
हेही वाचा…निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकरांवर ठाकरेंनी विश्वास दाखवला अन्.. बांदेकरांच्या कामाची ठाकरे गटाकडून पोचपावती