मुंबई : राज्य सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मराठा विरूद्ध ओबीसी असा सामाना रंगला आहे. ओबीसी आरक्षणासाठी आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणीसाठी छगन भुजबळ कार्टात दाखल झाले आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी याचिका बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली आहे. यातच आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
कुणबी असल्याच्या जुन्या नोंदी आता सरकार बाहेर काढत आहेत. त्या पाकिस्तान आणि अमेरिकेतून आणल्या नाहीत. छगन भुजबळ अभ्यासू नेते असून त्यांनी हे सर्व तापासून पाहिलं पाहिजे. मराठे हा एक सामुहिक शब्द असून तो एका जातीचा नाही. छगन भुजबळ यांनी अभ्यास असतांनाही असं बोलावं हे नवलंच आहे. मराठा हा कुणबीच आहे. काही लोक मतदानाच्या पेटीचा हिशोब करून या मुद्यांवर राजकीय पोळी कशी शिजता येईल. हे बघत आहेत. यातच कुणबी उल्लेख असेल तर त्याला कुणीही अडवणार नाही. असंही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
दरम्यान, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. मराठा मागास आहेत, असा कोणत्याच आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. त्यामुळे मागास म्हणून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. मराठा समाज हा गायकवाड आयोगाने मागास ठरवला होता. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. तोच समाज तीच व्यक्ती पुन्हा आपण वेगळ्या घटकात ती मागास आहे. असं म्हणणं आणि असं मान्य करणं हे चुकीचे असल्याचं वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ना पार्थ पवार ना सुनेत्रा पवार..!” ‘पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदा’साठी अजित पवारांनी जाहीर केलं दुसरचं नाव
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”