सोलापूर : सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळांनी विरोध दर्शविला आहे. अलिकडेच पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यावरून आता मराठा समाजाकडून भुजबळांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण
सोलापुरमधील बार्शी तालुक्यात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. बार्शीतील साखळी उपोषणाला तेरावा दिवस होत असून सकल मराठा समाजातर्फे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंत्रीपदावर राहुन मराठा समाजाला आरक्षण देऊन नका ही मागणी असंविधानिक असल्याने भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय
दरम्यान, पुरावे असतानाही ४० वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय. आम्हाला आरक्षण मिळतंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा नेत्यांमुळेच मराठा समाजाचं नुकसान झालं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान