मुंबई : मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांच्यावर कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या ने्त्यांकडून केला गेला आहे. त्यांच्याच संदर्भात आज ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. कोरोना काळात मुंबईत कशापद्धतीने काम करण्यात आलं हे संपुर्ण जगाने पाहिलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सगळं खंर सांगणार असून केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक
आतापर्यंत भरपुर लोकांवर आरोप झालेत. अन् ते आज राज्यात मंत्री झाले आहेत. त्यामुळे चौकशी होत असून सगळं बाहेर येऊ दे. त्यामुळे मुंबईत काम करत असतांना भ्रष्टाचार कोणी केला तो बाहेर आलाच पाहिजे. कारण हा मुंबईच्या करदाताच्या प्रश्न आहे. त्यामुळे चौकशी करण्याची मी देखील मागणी करणार. त्यामुळे मागे ज्यांच्यावर आरोप झालेत ते आता मंत्री झालेत. त्यामुळे यंत्रणांना सहकार्य करणार आणि ईडीच्या कार्यलयात जाणार असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
दरम्यान, कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांवर ठेवण्यात आला आहे. महापालिकेने १ हजार ८०० रूपयांची बॉडी बॅग ६ हजार ८०० रूपयांना खेरदी केली आहे. महापौर असताना पेडणेकरांच्या आदेशानं बॉडी बॅग खेरदीसाठी कंत्राट दिल्याचा आरोप आहे.
२१ जून रोजी ईडीने राज्यभर मारलेल्या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रोख रक्कम जप्त केली होती. यातून ईडीच्या छाप्यात १५० कोटींची स्थावर मालमत्ताही सील करण्यात आली. तर १५ कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूक देखील ईडीला या छाप्यांमधून मिळाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय