मुंबई : सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी आता नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना या पदावरून हटवून शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ २३ जुलै २०२३ ला संपला होता. त्यानंतर तीन वर्ष त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…“भडक वक्तव्य करून भुजबळांनी परिस्थिती खराब करू नये”, महायुतीच्याच मंत्र्यांनी भुजबळांना दिला इशारा
दादरमध्ये यापुर्वी घडला असा नव्हता प्रकार ज्याने घडवून आणला. आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टिव्हीवर देखील हा प्रकार दाखवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याच बंदूकीतून गोळी चालवली गेल्याचं सांगण्यात आलं. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक कारायची सोडून मिंधे आणि भाजप सरकारने सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवल्याची खरमरीत टिका आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्यावर केली आहे.
हेही वाचा…“पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट, जिल्ह्यात युतीची ताकद वाढली”
दरम्यान, पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण… ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता… पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल, असा घणाघात देखील त्यांनी चढवला.
दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती.
त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“अगोदर आरोप अन् नंतर मुश्रीफांच्याच कंपनीला कंत्राट”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा*
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…““दिवाळीनंतर संपुर्ण राज्यात ओबीसींचा एल्गार,” भुजबळांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?