पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नेत्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुणे लोकसभेसाठी पुण्यातील नेत्याला उमेदवारी देणार असल्याने तयारी लागा, असं बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. परंतु पुढे लोकसभांच्या निवडणुकांना काही महिन्याचाच अवधी शिल्लक असल्याने याठिकाणी पोटनिवडणुक अद्यापही झालेली नाही. यातच आता या जागेसाठी भाजपकडून स्थानिक उमेदवार देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
दरम्यान, काल पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये माजी नगरसेविकांसह नव्या व जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. महिला मोर्चाच्या शहाराध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये हर्षाली माथवड, अश्विनी पांडे, स्वाती लोखंडे, सरस्वती अडागळे, विजया भोसले, थोरविना येनपूरे, वंदना कोंद्रे, जान्हवी देशपांडे आणि कविता मुडविकर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर ७ महिलांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्ष हर्षदाताई फरांदे यांनी नियुक्त केलेल्या महिला मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.#bjp4pune pic.twitter.com/LV8sNwZZGx
— Dheeraj Ghate (@DheerajGhate) November 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक