मुंबई : ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली आहे. ओबीसीमध्ये इतर जातींचा कसा समावेश करण्यात आला. तसेच डुबलिकेट ओबीसींना बाहेर काढण्यात यावे, यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी कोर्टात होणार असून मंत्री छगन भुजबळ आता कोर्टात दाखल झाले आहेत.
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”
२०१८ साली मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी कोर्टात केस दाखल केली होती. आता ओबीसीमध्ये असलेले तेली, माळी, कुंभार अशा जातींना गैरकायदेशीर समावेश करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचं पुर्नरसर्व्हेक्षण करण्यात यावं य संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली. तोपर्यंत ओबीसी या सर्व जातींना ओबीसींचं आरक्षण रोखण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यामुळे आता ही केस पुन्हा ओपन केली आहे. एका बाजूने कायदेशीर आरक्षण मिळत नाही त्यांना ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसीमध्ये असलेल्यांना हायकोर्टात लढून त्यांना बाहेर काढलं जायचं असा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यामुळे आता या कायदेशीर लढ्याबाबत आमचं लक्ष असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना हवं तसं आरक्षण देण्याच्या भानगडीत सरकार पडत आहेत. एकाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या पत्नीला तसेच त्याच्या सर्व नातलगांना मिळणार. मग यातून कुणालाच काही मिळणार नाही. मग सगळ्यांना प्रमाणपत्र मिळालं तर यांना सर्व आरक्षणाचे अधिकार मिळणार. त्यामुळे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून त्यांना वेगळा आरक्षण द्या, असंही भुजबळांनी म्हटलं. यातच कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या लढा. त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु आता सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहेत. यातच मनोज जरांगे पाटील ऐकत नाही म्हणून लगेच ११ हजार झाले. त्यानंतर लगेच १३ हजार झालेत. आता तर आख्या महाराष्ट्रात कार्यालय उघडली असून ज्याला पाहिजे त्यांना दिलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
आता तर ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे. एका बाजूला त्यांनी ओबीसीमध्ये सामील व्हायचं अन् दुसऱ्या बाजूने कोर्टात लढून ओबीसींच्या लोकांना आरक्षणातून बाहेर काढायचं. असंही छगन भुजबळांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल
हेही वाचा…“ना पार्थ पवार ना सुनेत्रा पवार..!” ‘पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदा’साठी अजित पवारांनी जाहीर केलं दुसरचं नाव
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया