पुणे : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी ०८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रविण तरडे आणि सिनेअभिनेते रमेश परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा…“आम्हालाच ओबीसींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू”, छगन भुजबळांचा गंभीर आरोप
भाजप कोथरूड उत्तर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे शहर चिटणीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाला समोर बालेवाडी – बाणेर मेन रोड, ब्राव्हेरिया सोसायटी, समोर रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात पाच तासात तब्बल ४०० पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले. त्यानंतर रक्तदान केलेल्या लोकांना प्रत्येकी एक स्मार्ट वॉच आणि एक हेल्मेट भेट देण्यात आली.
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल
या कार्यक्रमासाठी भाजपचे शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर ज्योती कळमकर यांच्यासह प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषणाकर, सचिन दळवी, शिवम सुतार, उमा गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, अस्मिता करंदीकर, विवेक मेथा, संतोष जगदाळे, कल्याणी टोकेकर, अनिल ससार, राकेश पाडाळे, शरद भोते, सुभाष भोळ, सत्यजित पाठक, उत्तम जाधव, नितीन रणवरे, लखन कळमकर, शिवम बालवडकर, प्रविण आमले, रोनक गोटे, लश्र्ण मेघावत, निलेश सायकर, प्रसाद शिंदे, प्रसाद श्रीखंडे, विजय सुपेकर, अनिकेत चांदरे, निकिता माथाडे, राजेंद्र पाडाळे, सतिश बागल, प्रशांत बालवडकर, सुशिल सरकाटे, प्रमोद कांबळे, स्नेहल सुतार, नवनाथ ववले आदि उपस्थित होते.
दरम्यान, लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून चिटणीस लहू बालवडकर मागील काही वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. तरूण मुलांसाठी मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, वारकऱ्यांसाठी मोफत रूग्णवाहिकेची सोय, तसेच इतर अनेक सामाजिक उपक्रम सोशल वेलफेअरच्या माध्यमातून केले जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?
हेही वाचा…हसन मुश्रीफ महादेव अॅपचे सदस्य..! राऊतांच्या आरोपांवर मुश्रीफांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..,
हेही वाचा…“ना देवेंद्र फडणवीस ना अजित पवार,” कार्तिकी एकदशीला विठ्ठालाची शासकीय पुजा कोण करणार?
हेही वाचा…निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकरांवर ठाकरेंनी विश्वास दाखवला अन्.. बांदेकरांच्या कामाची ठाकरे गटाकडून पोचपावती
हेही वाचा…पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं