मुंबई : सिद्धिविनायक न्यास मंदिर अध्यक्षपदी आता नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना या पदावरून हटवून शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ २३ जुलै २०२३ ला संपला होता. त्यानंतर तीन वर्ष त्यांना ही जबाबदारी वाढवून देण्यात आली होती.
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा
२४ जुलै २०१७ ह्या दिवशी शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची ‘श्रीसिध्दीविनायक मंदिर न्यासा’च्या अध्यक्षपदी निवड झाली. २०२३ पर्यंत ६ वर्षे ते ह्या पदावर कार्यरत होते. ह्या कार्यकाळात त्यांनी न्यास आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून अनेक चांगली कामं करताना भाविकांची सेवा केली. न्यासातल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तींप्रमाणे वागणूक देताना प्रत्येकाशी आपुलकीचे संबंध जोपासले. असं ट्विट शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया
तसेच श्रीसिध्दीविनायकाची अहोरात्र सेवा करणारे श्रीसिध्दीविनायक मंदिर न्यासातील १९२ जण अस्थायी कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांना नोकरीत कायम करण्यासाठी बांदेकर ह्यांनी पाठपुरावा केला. २०१९ सालच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्रीसिध्दीविनायकाचे कृपाशिर्वाद लाभले आणि आदेश बांदेकरांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. तब्बल १९२ कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी करण्यात आले. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकर ह्यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ करुन दाखवला. असंही शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.
२४ जुलै २०१७ ह्या दिवशी शिवसेना सचिव @aadeshbandekar ह्यांची ‘श्रीसिध्दीविनायक मंदिर न्यासा’च्या अध्यक्षपदी निवड झाली. २०२३ पर्यंत ६ वर्षे ते ह्या पदावर कार्यरत होते. ह्या कार्यकाळात त्यांनी न्यास आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून अनेक चांगली कामं करताना भाविकांची सेवा केली.… pic.twitter.com/fmWjtvYSK9
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“आम्हालाच ओबीसींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू”, छगन भुजबळांचा गंभीर आरोप
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल
हेही वाचा…“ना पार्थ पवार ना सुनेत्रा पवार..!” ‘पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदा’साठी अजित पवारांनी जाहीर केलं दुसरचं नाव
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी