पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत कैद्यांची गाडी थांबवून पाकीट पुरवली जात असल्याचा आरोप लावत गृहखात संभाळण्यासाठी अपयशी ठरल्याची टिका करण्यात आली आहे.
हेही वाचा…“श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका”, तानाजी सावंतांना मनोज जरांगे पाटलांनी खडसावलं
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त पक्ष फोडण्यात मग्न झाले असून गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. तुम्ही नापास झालात. गृह खात्याकडे फडणवीसांचं दुर्लक्ष झालं असून गृहखात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तुमच्या अब्रुची लक्तरं पुन्हा एकदा महाराष्ट्रात टांगली गेली. असा घणाघात सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर चढवला.
हेही वाचा…“ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय आमचाच समजून भाजपने फटाके फोडले तर…” राष्ट्रवादीने भाजपला दिला इशारा
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड यातच तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या. असंही त्या म्हणाल्या.
उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..
कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड @Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm pic.twitter.com/kJpnRhBJSl— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांनी घोषित केला महाराष्ट्र दौरा, ” कसा असेल महाराष्ट्र दौरा ?
हेही वाचा…“नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटला, नाशिकच्या शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात याचिका”
हेही वाचा…नांदेडचे ‘हे’ पिता-पुत्र शिंदे गटात दाखल, शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश प्रवेश
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्