मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मागील काही वर्षापासून आदित्य ठाकरे सातत्याने पालिकेतील घोटाळ्यांसदर्भात भूमिका घेतांना दिसत आहेत. यातच आता ट्विटच्या माध्यमातून ते राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत.
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
मुंबईतील रस्ते कामाचा कंत्राट यांच्यासोबतचा करार अखेर मुंबई पालिका आयुक्तांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीने कंत्राटदाराला १६०० कोटींचा कंत्राट दिला होता. यावरून आदित्य ठाकरे यांनी सातत्याने यावरून आवाज उठवला होता. त्यानंतर कंत्राटदारांना सुनावणीसाठी बोलवलं होतं. परंतु ते सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत. यातच आता मुंबई पालिकेने कंत्राटदारांना ५२ कोटींचा दंडही सुनावला आहे.
हेही वाचा…“श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका”, तानाजी सावंतांना मनोज जरांगे पाटलांनी खडसावलं
दरम्यान, यातच मिंधे-भाजप राजवटीत मुंबईला सर्व बांजूनी लुटण्याची योजना आखली जात आहे. याबाबत रस्ता घोटाळा ६०८० कोटींचा निधी त्यांच्याच कंत्राटदार मित्रांच्या झोळीत टाकण्याचा कट सुरू होती. शेवटी काल माझ्या ट्विटनंतर आयुक्तांनी दक्षिण मुंबई रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराचा करार संपुष्टात आणण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
ट्विट प्रभाव क्रमांक : २
मेगा रोड घोटाळ्यातील एका कंत्राटदाराला अखेर नारळ!
जानेवारी २०२३ पासून, मी दर महिन्याला, @mybmc प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईवर थेट नियंत्रण मिळवलेल्या ‘मिंधे-भाजप’ राजवटीत मुंबईला सर्व बाजूंनी लुटण्याची कशी योजना आखली गेली आहे ह्याबद्दल सातत्याने आवाज… https://t.co/YiDN2GOQ6W
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांनी घोषित केला महाराष्ट्र दौरा, ” कसा असेल महाराष्ट्र दौरा ?
हेही वाचा…“नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटला, नाशिकच्या शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात याचिका”
हेही वाचा…नांदेडचे ‘हे’ पिता-पुत्र शिंदे गटात दाखल, शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश प्रवेश