बीड : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा कट पोलिसांनी मोठ्या शिताफीने उधळून लावला असून, याप्रकरणी परळी पोलिसांनी पत्नी असल्याचा दावा करत सातत्याने बेछूट आरोप करणाऱ्या करूणा शर्मा या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, परळीसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
करुणा शर्मा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तूल प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया… काय म्हणाले…
दरम्यान, या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत असून, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पिवळी ओढणी तोंडाला बांधलेली तरुणी, शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत काहीतरी संशयास्पद वस्तू ठेवत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले असून, करुणा शर्मा यांना अडकवले गेले आहे का? जाणूनबुजून हा सापळा रचण्यात आला आहे का? असे सवाल यामुळे निर्माण झाले आहेत.
पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव; करूणा शर्मा बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात
मागील २-३ दिवसांपासून करूणा शर्मा फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत होत्या. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका व्हिडिओत त्यांनी, वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार असून, त्यांनतर पत्रकार परिषद घेणार व मुंडेंच्या घरी जाणार असे त्यांनी सांगितले होते. त्याचसाठी त्या परळीत आल्या होत्या. मात्र, काही लोकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली आणि गाडी भर बाजारात थांबली. त्याचवेळी, या महिलेने कारमध्ये काहीतरी ठेवले, असे व्हिडीओत दिसत आहे.
“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
यावर आता अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रया व्यक्त केली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत, यावरून कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. “बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे, याची सखोल चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे, तर, “काय चाललंय महाराष्ट्रात? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, तिला चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते, असा सावल नितेश राणे यांनी केला.
Read Also :
- चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध
- संजय राऊत तोंडघशी पडले, बेळगांव महानगरपालिकेवर भाजपची मुसंडी, स्पष्ट बहुमत
- शरद पवार यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ – गुणरत्न सदावर्ते
- वसंतदादा पाटीलांचा विश्वासघात करून पवारसाहेब आघाडीतून कसे बाहेर पडले? -भाजप
- तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का?