परळी : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा कट पोलिसांनी मोठ्या शिताफीने उधळून लावला असून, याप्रकरणी परळी पोलिसांनी पत्नी असल्याचा दावा करत सातत्याने बेछूट आरोप करणाऱ्या करूणा शर्मा या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, परळीसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
मागील २-३ दिवसांपासून करूणा शर्मा फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत होत्या. आधीच्या व्हिडीओत त्यांनी अगामी निवडणुकीत पंकजा मुंडेंना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. तसेच, वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार असून, त्यांनतर पत्रकार परिषद घेणार व मुंडेंच्या घरी जाणार असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळून आल्याने, हा मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा तर डाव नव्हता? असा संशय व्यक्त केला जात आहे.
“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
दुसरीकडे, ही वार्ता वाऱ्यासारखी परळी शहरात पसरल्यानंतर करूणा शर्मा यांच्या अटकेसाठी आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ परळीतील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. आपण मुंडे यांची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा याआधी देखील अनेकदा प्रयत्न केला असून, आज थेट त्यांना संपवण्यासाठी डाव आखला गेला आहे, असा आरोप या महिलांनी केला आहे. त्यामुळे, त्यांना अटक करण्याची जोरदार मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
Read Also :
- “आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही”, पवारांचा घणाघात
- पवारांनी खंजीर खुपसल्याचा एक दाखला द्या, मी राजकारण सोडतो!
- ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “निवडणुकांशिवाय महापालिका ताब्यात ठेवायचा सरकारचा कट”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान