पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असून, पक्ष बांधणीसाठी आणि रणनिती आखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पुणे जिल्ह्याचे दौरे करत आहेत. दरम्यान, ते आज पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असून, पुण्यात पक्ष कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
“राज्यात महापालिका निवडणुकांशिवाय त्या-त्या ठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट ठाकरे सरकार आखत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. “या सरकारची निवडणुका घेण्याची इच्छा नाही. या भूमिकेकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे. ओबीसी-मराठा आरक्षण आणि कोरोनाचा मुद्दा पुढे करुन हे सरकार निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट घालत आहे. ठरवलं तर ओबीसी जनगणना करण्यासठी राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे,” असं ते म्हणाले.
‘करेक्ट कार्यक्रमा’च्या इशाऱ्यांनंतर, शेट्टींच्या आमदारकी बाबत पवारांनी केला मोठा खुलासा
तसेच, सण, उत्सव आणि निर्बंधांवरूनही त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. “दुसरी लाट-तिसरी लाट, अशी भीती दाखवली जाते. पण या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे चांगलं लक्षात आलेलं आहे की, जे चाललं आहे ते बरं चाललं आहे. कारण, कुठं कसली आंदोलनं नाहीत, कसले मोर्चे नाहीत, सरकार कुठलंही असो विरोधात कुणी रस्त्यावर उतरणार नाही. आपले पैसे कमवा, आपली-आपली दुकानं चालवा एकंदरीत बरं चाललंय,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
“आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला
मध्यंतरी राज ठाकरेंनी, “राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवादी राजकारण वाढले,” असे विधान केले होते. त्यावरून मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी त्यांना, “त्यांचा अभ्यास नसावा,” अशी टीका केली होती, अजित पवरांनी “त्यावर मी भाष्य करणार नाही,” असे सांगितले तर, शरद पवारांनी “राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तके वाचावी,” असा सल्ला दिला होता. दरम्यान, आजचा त्यांचा चौथा पुणे दौरा असून, निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ते काय सांगतात याकडे लक्ष लागून आहे
Read Also :
- …म्हणून वाझेने ‘अँटिलीया’बाहेर पार्क केली स्फोटकांची गाडी, NIA ने केले आरोपपत्र दाखल
- “पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…
- “आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
- महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक, पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट
- पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक