उस्मानाबाद : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेच्या सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना, उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, शंभू महादेव साखर कारखान्याच्या ४६ कोटी रुपयांच्या साखर अफरातफर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
दरम्यान, थेट दुसऱ्यांदा बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यावर पोलिसांकडून ही कारवाई केली गेली असल्याने एकच खळबळ उडाली असून, आहे. सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांच्यावर तब्बल १ लाख १४ पोते साखरेच्या पोत्यांत अफरातफर केली असल्याचा आरोप प्रशासनाने ठेवला आहे.
काय आहे प्रकरण?
परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
उस्मानाबाद जिल्ह्यातील सावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याने, परळीतील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून तब्ब्ल ४६ कोटी रुपयांची साखर ठेवली होती. मात्र यात बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अफरातफर केली गेली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच, याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात या साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप अपेट आणि ४० जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
त्या कारवाईनंतर आता पोलिसांकडून बँकेवर केली गेलेली दुसरी कारवाई आहे. त्यामुळे, पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात असून, आता या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई काय केली जाते, याकडे लक्ष लागून आहे. तसेच, यावर पंकजा मुंडे यांच्याकडून अद्यापही काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Read Also :
- १२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
- तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?
- “भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान
- चुकीचे वागणाऱ्यांची शहनिशा करणे आमचे कामच; नगरसेवकांवर दाखवलेल्या अविश्वासाला अजितदादांचा पाठींबा
- ईडीच्या माध्यमातून भाजप आम्हाला बदनाम करतयं, खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी – जयंत पाटील