नांदेड : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. “ठरलेला समझोता पाळायचा की पाठीत धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनेच ठरवायचं आहे, आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो,” असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला.
परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
दरम्यान, या प्रकरणात आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि शेट्टी यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांनी शेट्टींना जोरदार टोला लगावला असून, “त्यांच्या आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. मला वाटतं, महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली, पहिल्यांदा झाली ती मी मंत्री होतो म्हणून, तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला, आता भ्रमनिरास झाला की नाही? झाला असेल तर त्यांनी आता परत एकदा आत्मक्लेष यात्रा काशीपर्यंत काढावी,” अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.
खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
आज नाव वगळण्याच्या चर्चेवरून खोतांनी, “विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं, हा स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीत झालेला समझोता आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशारा राष्ट्रवादीला दिला. “मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असंही ते म्हणाले.
अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
तसेच, पूरग्रस्तांच्या मदतीवरून राज्य सरकार व केंद्र सरकारवर सडकून टीका करताना, “या पदयात्रेचा आज चौथ्या दिवस असून आजही पदयात्रा रांगोळी गावात आली. यावेळी त्यांचे महिला वर्गाने जंगी स्वागत केलं. राज्य सरकारकडून आम्हाला अजून कोणतेही आश्वासन आले नाही. आम्ही आमच्या जलसमाधीवर ठाम आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- …म्हणून वाझेने ‘अँटिलीया’बाहेर पार्क केली स्फोटकांची गाडी, NIA ने केले आरोपपत्र दाखल
- “पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…
- “आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
- महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक, पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट
- पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक