भिवंडी : “भाजपत सर्वांना समान संधी दिली जाते”, “भाजपत महिलांना सन्मान दिला जातो”, अशी विधाने भाजप नेत्यांकडून केली जातात. मात्र, याला छेद देणारं विधान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं असून, हे विधान महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत केल्याने, आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नाही”, असा गंभीर आरोप त्यांनी जाहीरपणे केला आहे.
“आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान केले आहे. “मंदा म्हात्रे यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेऊ.” असं ते म्हणाले आहेत. ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दैनिक लोकमतकडून ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’च्या कार्यक्रमात, भिवंडीच्या समाजसेविका व ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी म्हात्रे यांनी विधान केलं.
महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक, पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट
“मी दोनवेळा विधानसभेवर निवडून आले. मात्र त्यानंतरही पक्षाकडून डावललं जातं होतं.त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीत मी पक्षाला अपक्ष लढण्याचे संकेत दिले होते. ती निवडणुक स्वतःच्या जीवावर मी निवडून आले. पहिल्या वेळी आले तेव्हा ‘मोदी लाट’ होती म्हटलं गेलं. पण दुसऱ्या वेळेला मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, पण महिलांच्या कामाला झाकून टाकायचं, त्यांच्या कामाला प्रसिद्धी द्यायची नाही, असे प्रकार होतात”, असं त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक
तसेच यावेळी त्यांनी व्यासपीठावरून भाजपवर हल्लाबोल करत, पक्षाला घरचा आहेर दिला. “मी कोणालाही घाबरत नाही. घाबरण्याची मला गरज नाही. मी नेहमीच स्पष्टच बोलते. मग तिकीट द्या, किंवा देऊ नका! मी लढणार म्हणजे लढणार. आपल्याला इतर पक्ष असतात साथ द्यायला,” असं म्हणत, “राजकारणात महिलांना यश मिळतंय म्हटल्यानंतर स्वपक्षातीलच नेते महिला नेत्यांचे पंख छाटून टाकतात. पण आपण स्वतःला कमी समजू नये”, या शब्दांत त्यांनी मनातली खदखद व्यक्त केली.
Read Also :
- परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
- अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
- १२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
- तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?