मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यातच आता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर राऊत यांनी टीका केली होती, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यावर आता स्वतः राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं असून, ‘राज्यपालांवर मी टीका केली नाही. भाजपला तसं वाटत असेल तर मला आत्ताच अटक करावी’, असं थेट आव्हान त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना केलं आहे.
‘करेक्ट कार्यक्रमा’च्या इशाऱ्यांनंतर, शेट्टींच्या आमदारकी बाबत पवारांनी केला मोठा खुलासा
त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “राज्यपाल हे पद आणि ती व्यक्ती आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहे आणि असेल. मी त्यांच्यावर टीका केली नाही. पण तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या हातात असेल, तर मला आता अटक करा’, असं खुलं आव्हान त्यांनी पाटलांना दिलं आहे. तसेच, ‘चंद्रकांत पाटलांनी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य नीट आहे का पाहिलं पाहिजे. कदाचित ते वैफल्यग्रस्त आहेत’, अशी सडकून टीकाही त्यांनी केली.
“आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला
काल चंद्रकांत पाटलांनी राऊत यांच्यावर टीका करताना, ‘राऊत नक्की कुणासाठी काम करतात? पवारांसाठी की शिवसेनेसाठी?’ असा सवाल केला होता. त्यावरही उत्तर देताना, ‘कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते आणि आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांशीही चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे. त्यामुळे, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. हे राज्य सरकार पडणार नाही’, असा दावा त्यांनी केला.
“पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…
तसेच, चंद्रकांत पाटलांनी, ‘राऊतांच्या दंडात ताकद आहे का?’ असा बोचरा थेट राऊत यांना केला होता. त्याला उत्तर देताना, ‘शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, इतिहास लक्षात घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्हीही असतो’, असा हल्लाबोल त्यांनी केला. दरम्यान, शिवसेना-भाजप नेत्यांत राणेंच्या आशीवार्द यात्रेनंतर संघर्ष आणखीन टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- “आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
- परप्रांतीयांना ओबीसीत आरक्षण दयायला भाजपचा विरोध?, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
- अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
- पंकजा मुंडे यांना मोठा झटका, वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अधिकाऱ्याला अटक