नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील दौऱ्यावर आले असता त्यांनी गोदातरी महाआरती केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचंही दर्शन घेतले. तर काही वेळा टाळ वाजवत भक्तीरसातही तल्लीन झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वत: काळाराम मंदिराची साफ सफाई केली. यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने पाच दिवसापासून काळाराम मंदिराच्या साफ सफाईसाठी ८ ते १० लाख रूपये खर्च केले. मग नरेंद्र मोदी यांना साफ सफाई करण्याची गरज होती काय ? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील दौऱ्यावर आले असता विविध कार्यक्रम पार पाडले. यातच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाला देखील हजेरी लावली. त्याआधी मोदींचा नाशकात भव्य रोड शो पार पडला. त्यातच गोदाआरती, काळाराम मंदिरात जाऊन दर्शन, भजन, असे विविध काम पार पडले. तर काही वेळ मोंदींनी स्वत: काळाराम मंदिराची साफ सफाई केली. यातच देशातील प्रत्येक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणांची साफ सफाई केली जावी, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मोदींना टोला लगावला आहे.
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिर दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खातं गेल्या ५ दिवसापासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चका चक केले. या कामासाठी ८ ते १० लाख खर्च केले. मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर २ ते ४ लाख खर्च केल्याचे समजत आहे. अनेक ठइकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते.. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मोप घेऊन सफाई दर्शन केले. याची खरचं गरज होती काय ? असा सवाल करत याचा अर्थ असा की सरकारने सफाईवर खर्च केलेले १० ते १२ लाख रूपये वाया गेले. असंही म्हणत राऊतांनी भाजपला डिवचलं.
आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला..
पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते.त्यांनी मंदिर एकदम चका चक केले..या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले.
मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च… pic.twitter.com/8kZ5YhRS7k— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2024
READ ALSO :
हेही वाचामहायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश