बुलढाणा : शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्यय यांना संतोष बांगर मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरून राष्ट्रवादीचे युवाकार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमदार संतोष बांगर यांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिला आहे का? अनेक अवैध धंदे करणाऱ्या संतोष बांगर यांना तातडीन अटक करावी, राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही. असा सवालही सुरज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
“माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही”; संतोष बांगरांची त्यानंतर प्रतिक्रिया
कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. आमदार बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे काम पकड मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपुर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ घातली आहे.
“मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे
त्या प्राचार्यांनी एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे त्यांना जाब विचारला. त्या महिलेवर अन्ययाच्या व्हिडीओची क्लीप माझ्याकडे आहे. आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. महिलेवरील अन्याय संतोष बांगर सहन करणार नाही. सरकार आमचे असले तरी आवाज उठवावा लागतो. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही. मी या घटनेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आ.संतोष बांगर यांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिला आहे का ? अनेक अवैध धंधे करणाऱ्या संतोष बांगर यांना तातडीने अटक करावी.राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 26, 2023
Read also
- ‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
- मुलायम सिंह यादव, झाकीर हुसेन, सुधा मुर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार…! वाचा संपुर्ण यादी
- “फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे
- “सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”
- “शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला”; गुणरत्ने सदावर्तेंची राष्ट्रवादीवर टीका