बुलढाणा : शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्यय यांना संतोष बांगर मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आता संतोष बांगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी
त्या प्राचार्यांनी एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे त्यांना जाब विचारला. त्या महिलेवर अन्ययाच्या व्हिडीओची क्लीप माझ्याकडे आहे. आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. महिलेवरील अन्याय संतोष बांगर सहन करणार नाही. सरकार आमचे असले तरी आवाज उठवावा लागतो. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही. मी या घटनेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?
शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा एका पॉलिटिकल प्राचार्यला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा रिपब्लिकन खरात पक्ष जाहीर निषेध करीत आहे. संतोष बांगर सध्या विधीमंडळात आहेत. त्यांनी तर कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे. परंतु ते कायदे तोडतांना खुलेआम दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्य हे आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार खऱचं चालत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी, असंही सचिन खरात यांनी सांगितलं आहे.
Read also
- “मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे
- पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”
- भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?
- “राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”