परभणी : राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुराणी हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा परभणीतील शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी केला आहे. बाबाजानी दुराणी हे शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र बाबाजानी दुराणी यांनी सईद खान यांचा दावा फेटाळला आहे. शिंदे गटाच्या संपर्कात नसल्याचं बाबाजानी दुराणी यांनी म्हटलं आहे.
आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
अनेक नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादीला सोडून गेले आहेत. त्यातच बाबाजानी दुराणी हे बऱ्याच दिवसापासून शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांच्या संपर्कात आहेत. ते शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच येत्या 19 फेब्रुवारीला ते स्वत:च अर्जून खोतकर यांच्या घरी जाऊन शिंदे गटात प्रवेश करतील असं सईद खान ह्यांनी म्हटलं आहे.
चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
दोन दिवसापासून मुंबईला गेलो होतो. आज मुंबईहून परतलो आहे. आल्यानंतर पहिल्यांदा अर्जून खोतकर यांना फोन करून याप्रकरणाची चौकशी केली. त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. सईद खान खोटे बोलत आहे. मी अर्जून खोतकर यांच्या संपर्कात नाही. असं स्पष्टीकरण त्यानंतर बाबाजानी दुराणी यांनी दिलं आहे.
Read also
- “कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी
- चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?
- “चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या, पहिली”; रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं
- “बांगराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बांगरावर योग्य ती कारवाई होईल”, फडणवीसांचा इशारा
- मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही