पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजापणामुळे निधन झालं. त्यांच्या जागी आता चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदार संघात निवडणुक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र या दोन्ही पोटनिवडणुकासाठी मतदान तारखेत बदल केला आहे. सुरूवातीला या पोटनिवडणुकासाठी 27 फेब्रवारी मतदान होणार होतं. त्याजागी आता 26 डिसेंबर रोजी होणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.
कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही
चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने 27 फेब्रवारी रोजी तारीख जाहीर केली होती. मात्र बारावीच्या परिक्षा असल्याने निवडणुक आयोगाने ही तारीख बदलली आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकांसाठी 26 फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. तर 02 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
“लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे
निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 31 जानेवार 2023 रोजी उमेदवारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 06 फेब्रवारी 2023 पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल. तर 08 फेब्रवारी 2023 पर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 10 फेब्रवारी 2023 रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असणार आहे. तर 27 फेब्रवारी 2023 रोजी या जागांसाठीचं मतदान होणार असून याची मतमोजणी 02 मार्च रोजी होणार आहे.
शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
दरम्यान, चिंचवड आणि कसबा पेठ ह्या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध न होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षांनी देखील मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तर अद्यापही भाजपकडून कोणालाही आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी कुणाला उमेदवारी देणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची मॅरेथॉन बैठक..! उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक
- कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात
- धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
- “तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”