पुणे : चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्या जागी लागलेल्या पोटनिवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याबाबत आज चिंचवड शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून या पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.
“लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी आता त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि जगताप यांचे बंधू शंकर जगपात यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. तर भाजपकडून आणखी काही उमेदवार ही पोटनिवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी 1 वाजता होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार, कुणाला उमेदवारी जाहीर करणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
या बैठकीसाठी पिंपरी चिंचवड शहाराचे शहाराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे आदी पदाधिकारी उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. यातच कसबा पेठ पोटनिवडणुकीचीही अलिकडचे चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत अद्यापही कोणताही उमेदवार घोषीत केला नसुन या पोटनिवडणुकांसाठी मात्र समित्या स्थापन केल्या आहेत. यातच चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत काय निर्णय होणार ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
दरम्यान, महाविकास आघाडीसह, आप, एमआयएम देखील या पोटनिवडणुकांसाठी मैदानात उतरली आहे. त्यामुळे दोन्हीही निवडणुका ह्या बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातच आता पाच ते सहा फेब्रुवारी पर्यंत राजकीय पक्ष या पोटनिवडणुकांसाठी उमेदवार घोषीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नेमकी कुणाला उमेदवारी देतील. त्याकडे लक्ष्य लागून राहिलंय.
Read also
- लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक
- कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात
- धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
- “तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही