मुंबई : मागील काही महिन्यापासून शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भात चर्चा सुरू आहे. येत्या 30 जानेवारी रोजी निवडणुक आयोग धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधी ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणुक आयोगाने 30 जानेवारी पर्यंत लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे. याबाबत शिंदे गट लेखी उत्तर देणार असून ठाकरे गट याबाबत कोणतंही लेखी उत्तर देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
अलिकडेच निवडणुक आयोगासमोर धनुष्यबाणासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटातील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना धनुष्यबाणाबाबत लेखी उत्तर देण्यासाठी 30 जानेवारीची मुदत दिली आहे. यातच दोन्ही बाजूंच्या गटाने आपापली कागदपत्रे निवडणुक आयोगासमोर सादर केली आहेत. त्यामुळे आता निवडणुक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत असून याच कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड करतात. त्यामुळे शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारीणी बेकायदेशीय, असून एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही. मग एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर केला आहे. असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाची कार्यकारीणी बरखास्त होऊ शकत नाही. ती पक्षाच्या घटनेप्रमाणे तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात पतिज्ञापत्र आयोगाला दिली. शिंदेंची प्रतिज्ञापत्र तपासून पाहा असा युक्तिवाद देखील त्यांनी केला आहे.
मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतेपद बेकायदेशीर असून मुख्य नेतेपद हे पक्षाच्या घटनेत नाही. त्यामुळे हे पद बेकायदेशीर आहे. तसेच शिंदे गटाच्या संख्येइतकाच ठाकरे गटाचं संख्या हे तुल्यबळ आहे. राजकीय पक्षाचं संख्याबळ ठाकरेंकडेच आहे. असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलाय. युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली नंतर मतदारांना सोडून दिलं. असा युक्तिवाद शिंदे गटाकडून देण्याची शक्यता आहे.
Read also
- “तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही
- “लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे
- शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
- इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?