पुणे : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबापेठ विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवारीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून उमेदवारीसाठी रस्सीखेस सुरू झाली आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची यासंदर्भात अगोदरच बैठक पार पडली आहे. तर उद्या उद्धव ठाकरे गटाची यासंदर्भात बैठक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी तिन्ही पक्षातील नेते आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार का ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार झाला असल्याचं अलिकडेच काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. या पोटनिवडणुकीसाठी काॅंग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही निवडणुक लढविण्याचे सुतोवाच अगोदरच केले आहे. त्यामुळे काॅंग्रेसकडून रविंद्र धंनगेकर, अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तर राष्ट्रवादीही ही पोटनिवडणुक लढविणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
“माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
यातच आता कसबा पेठ पोटनिवडणुकीची जागा शिवसेनेला द्या. अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. महाराष्ट्रात सत्तांतरण झाल्यानंतर लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबाबत खुप सहानुभूती तयार झाली आहे. विरोधामध्ये प्रंचड चीड निर्माण झाली आहे, त्यामुळे याच सहानुभूतीचा फायदा महाविकास आघाडीला होईल, त्यामुळे ही जागा आम्हाला देण्यात यावी, असं विशाल धनवडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपकडून ही निवडणुक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या हालचाली बघता भाजपही सावध पावलं टाकत आहे. यातच भाजपकडून हेमंत रासने, गणेश बीडकर का मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देईल. यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. याचं सगळं चित्र पुढील आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Read also
- “लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे
- शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
- इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
- काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
- “शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया