पुणे : भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या जागेवर होऊ घातलेली पोटनिवडणुकीत आता रंगत बघायला मिळत आहे. कारण भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, आप आणि आता एमआयएम सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारी आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकां आता तिरंगी लढत होणार का काय? अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
एमआयएमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पिंपरी कार्यालयात प्रदेश महासचिव तथा प्रश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अकील मुजावर यांनी या पोटनिवडणुका लढविणार असल्याचं सुतोवाच केले आहे. काल झालेल्या बैठकीत त्यांनी चिंचवड आणि कसबा पेठ ह्या दोन्ही निवडणुका लढविणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
एमआयएचे कसब्यात पाच आणि चिंचवड मध्ये तीन इच्छुक उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी आहेत. उमेदवारी कुणाला द्यायची याची घोषणा प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील हे 27 जानेवारीला पुण्यात करणार आहेत. असं पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता याठिकाणी मोठी चढाओढ बघायला मिळणार आहे.
“शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबापेठ विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवारीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून उमेदवारीसाठी रस्सीखेस सुरू झाली आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची यासंदर्भात अगोदरच बैठक पार पडली आहे. तर उद्या उद्धव ठाकरे गटाची यासंदर्भात बैठक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी तिन्ही पक्षातील नेते आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार का ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
Read also
- धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
- “तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही
- “लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे
- शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं