पुणे : भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या जागेवर होऊ घातलेली पोटनिवडणुकीत आता रंगत बघायला मिळत आहे. कारण भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, आप आणि आता एमआयएम सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारी आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकां आता तिरंगी लढत होणार का काय? अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता भाजपमधून चिंंचवड पोटनिवडणुकीसाठी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
चिंचवड पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही निवडणुक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी देखील आपण निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे.
इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदारकीला शोभणारी तुमची कामे आहेत असे नखाते यांचे नेमही जगताप हे करायचे , अशी आठवण चंद्रकांत नखाते यांनी सांगितली. लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न मी पुर्ण करण्यासाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच नखाते हे तीन वेळेस महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत. तसेच ते क्रीडा समितीचे सभापती देखील होते.
काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
दरम्यान, एमआयएमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पिंपरी कार्यालयात प्रदेश महासचिव तथा प्रश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अकील मुजावर यांनी या पोटनिवडणुका लढविणार असल्याचं सुतोवाच केले आहे. काल झालेल्या बैठकीत त्यांनी चिंचवड आणि कसबा पेठ ह्या दोन्ही निवडणुका लढविणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात
- धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
- “तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही
- “लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे