मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार लवकरच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं संकेत दिले आहे. त्यामुळे आता या विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर होणार आहे. यामध्ये भाजपच्या गोटात आणखी 14 ते 16 मंत्रिपद मिळणार असून 2 मंत्रिपद राखून ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपकडे एकूण 23 ते 25 मंत्रिपद असणार आहेत. आता यामध्ये कुणाला संधी मिळणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे.
“तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”
तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटात 5 ते 7 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून त्यांच्याकडे दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 14 ते 16 मंत्रिपद असण्याची शक्यता आहे. आता या 40 बंडखोर आमदारांपैकी कुणाला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार. त्याही कडे लोकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात 20 मंत्री असून आणखी काही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे एकूण 23 मंत्रिपद रिक्त आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार अशंत: करायचा की पुर्ण 23 मंत्रिपद भरायची यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपकडून मंत्रिपद मिळवण्यासाठी खलबत सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read also
- आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
- चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
- चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची मॅरेथॉन बैठक..! उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक
- कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात