ठाणे : शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेला खिंडार पडत असतांना दुसऱ्या बाजूला ठाण्यात राष्ट्रवादीलाही मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यातील तब्बल 22 माजी नगरसेवक पक्षाची साथ सोडणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
“तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांना कधीही पदमुक्त करण्याचा निर्णय घेतील”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आता राजकीय वातावरण तापायला लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 नगरसेवक दिग्गज असल्याचंही सांगण्यात येत आहे.
कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही
गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेला गळती लागली आहे. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटाचा हात धरला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याचं समजत आहे.
Read also
- चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
- चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची मॅरेथॉन बैठक..! उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक
- कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात
- धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा