पुणे : मागील काही दिवसापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडत आहेत. यामध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध होतांना दिसत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौऱ्यावरून मोदींची मला फार काळजी वाटते असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर चित्रा वाघ यांनी टोला हाणला. त्यातच आता चित्रा वाघ यांना रूपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक
मोदींच्या मुंबई दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी मोदींना काळजी घेण्याची विनंती केली होती. त्यावर अहो, सुप्रिया ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या…! पक्षातील खदखद चव्हाट्यावर आली आहे. बाकी मग नरेंद्र मोदी यांची काळजी घेण्यास 130 कोटी भारतीय सक्षम आहेत. भाजपा हे एक कुटूंब असल्याने कोणत्याही कामापुर्वी, कुटूंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेणे हे आपली भारतीय संस्कृती असं म्हणत चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात
चित्रा वाघ यांच्या टिकेला रूपाली पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या पहिली. मुलांशी गप्पा गोष्टीवर सुद्धा घाण राजकारण करण्याची सवय तुम्हाला लागली आहे, ती अगोदर बंद करा. राजकारण चांगले करायचे सोडून तुम्ही सुद्धा पातळी घालवलीच असो. असं म्हणत रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
दरम्यान, पुण्यातील मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्या म्हणून रूपाली पाटील यांची खरी ओळख होती. त्यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अगदी कमी अवधीतच त्यांना राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे. यातच आता कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता रूपाली पाटलांकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
अहो @supriya_sule ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या! पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर आलीये 😂
बाकी मा. @narendramodi जी यांची काळजी घेण्यास 130 करोड भारतीय सक्षम आहेत
भाजपा हे एक कुटुंब असल्याने कोणत्याही कामापूर्वी, कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेणे ही आपली भारतीय संस्कृती! pic.twitter.com/9hS8J50OyH
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 19, 2023
Read also
- “बांगराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बांगरावर योग्य ती कारवाई होईल”, फडणवीसांचा इशारा
- मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही
- आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
- चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
- चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची मॅरेथॉन बैठक..! उमेदवार घोषीत होण्याची शक्यता