पुणे : चिंचवड मतदार पोटनिवडणुकीबाबत आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीला शहाराध्यक्ष महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, शंकर जगताप आदी उपस्थितीत होते. तसेच चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जगताप कुटुंबीयांच्याच सदस्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही
चिंचवड पोटनिवडणुकीकरीता उमेदवार कोण असावा, याचा निर्णय आमची भाजपची कोअर कमिठी करीत असते. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. तुमच्या प्रश्नांमध्ये पिंपरी चिंचवड नागरिकांचं आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं उत्तर आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबातीलच सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत कुणाचं दुमत नसणार असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
आजची जी बैठक पार पडली, या बैठकीत उमेदवाराबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उमेदवार ठरविण्याचा अधिकार भाजपच्या कोअर कमिठीला आहे. ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र या निवडणुकीबाबत आम्ही गाफील राहणार नाहीत. त्यामुळे याची तयारी आम्ही सुरू केली आहे. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
दरम्यान, महाराष्ट्रात एक संस्कृती पहिल्यापासून राहिलेली आहे. एखाद्या जागेवर सदस्यांचं निधन झालं तर त्याबाबत सगळेच जण सहकार्य करीत असतात अन् ती निवडणुक ही बिनविरोध होते. यांचं उत्तम उदाहरण म्हणून आपण अंधेरीची पोटनिवडणुक पाहिली आहे. अनेक नेत्यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी , म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने या पोटनिवडणुकीला विरोध केला नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
- “कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी
- चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?
- “चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या, पहिली”; रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं
- “बांगराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बांगरावर योग्य ती कारवाई होईल”, फडणवीसांचा इशारा