बुलढाणा : शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्यय यांना संतोष बांगर मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
“बांगराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, बांगरावर योग्य ती कारवाई होईल”, फडणवीसांचा इशारा
शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा एका पॉलिटिकल प्राचार्यला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा रिपब्लिकन खरात पक्ष जाहीर निषेध करीत आहे. संतोष बांगर सध्या विधीमंडळात आहेत. त्यांनी तर कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे. परंतु ते कायदे तोडतांना खुलेआम दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्य हे आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार खऱचं चालत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी, असंही सचिन खरात यांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही
कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. आमदार बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे काम पकड मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपुर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ घातली आहे.
आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
विशेष करून संतोष बांगर यांचे अशा प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज देऊनही त्यांचे असे प्रकार घडत आहेत. त्यावर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर यांच्यासंदर्भातील व्हिडीओ आणि घटनेची योग्य ती पाहणी करून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Read also
- भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?
- “राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
- “कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी”, एकनाथ शिंदेंची मागणी
- चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी…! आता तर राऊतांनीही केली मागणी, लढत की बिनविरोध?
- “चितरू ताई..! तुम्ही ऊर्फी विषयाची काळजी घ्या, पहिली”; रूपाली पाटलांनी चित्रा वाघ यांना डिवचलं